Back to Blog
‘रामकृष्ण’ मध्ये भरली आई-बाबांची शाळा
डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
27 May 2026
समाचार / नगर – दि. ११
श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या इंदिरा माध्यमिक स्कूल व मोहेलता रामदास मानवता ज्युनिअर कॉलेज येथे सेंटर ऑफ एक्सलन्स विभागातील महास्कील टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि ब्रेनटेक काउन्सेलिंग थेरपी यांच्या वतीने ‘आई-बाबांची शाळा’ हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये डॉ. सुरेश भारती यांनी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असून मुलांच्या मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी घरातील वातावरण सकारात्मक असणे गरजेचे आहे.
‘आई-बाबांची शाळा’ या माध्यमातून पालकांना मुलांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळते. मुलांच्या विकासातील विविध टप्पे, त्यांचे वर्तन, सवयी, अभ्यासाची गरज, मानसिक आरोग्य तसेच पालकत्वाची जबाबदारी या विषयांवर डॉ. भारती यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त श्री. गोपाळ घुले यांनी केले. पालकांना सखोल मार्गदर्शन डॉ. सुरेश भारती यांनी केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. गोपाळ घुले, उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष नंदकुमार संघवे, सचिव डॉ. शरद कोल्हे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.